Home अहमदनगर बेपत्ता युवती, मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ

बेपत्ता युवती, मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ

Ahmednagar Dead body Found in Well: शेतातील विहिरीत एक़ा युवतीचा मृतदेह आढळून आला.

Missing girl, Dead body found in well stirs

शनिशिंगणापूर:   बेल्हेकर वाडी रोड परिसरात असलेल्या शेतातील विहिरीत एक़ा युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. ही मुलगी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची चर्चा होती.  याप्रकरणी संशयित म्हणून हृतिक नामक तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  ही घटना छेडछाड व एकेरी प्रेमप्रकरणातून घडल्याची चर्चा सुरू आहे.

दुसर्‍या घटनेत सोनाली सुनील जावळे (वय 19, रा. कौठा) या महिलेने काल बुधवार 14 डिसेंबर रोजी विषारी पदार्थ सेवन केल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी मृत्यू झाले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सोनई पोलिसांना कळविले.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

आणखी एक घटना अपघाताची घडली. शनिशिंगणापूर रोडवर एका शाळे समोर मिनी लक्झरी व अज्ञात वाहन एकमेकांना घासून सायंकाळी 5 च्या सुमारास अज्ञात वाहनाला जोराची धडक दिली, यात या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र यात जीवितहानी अथवा जखमी झालेल्यांंची माहिती मिळाली नाही, स.पो.नि.माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. प्रवीण आव्हाड यांच्यासह पथक तपास करत आहे. दरम्यान घटनास्थळी धाव घेऊन रीतसर पंचनामा केला आहे. या सर्वच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Missing girl, Dead body found in well stirs

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here