संगमनेर: दहा गोवंश जनावरांची कत्तलीपासून सुटका
Breaking News | Sangamner Crime: मदिनानगरमधील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या दहा गोवंश जनावरांची सुटका.
संगमनेर: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह शहर पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि.७) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मदिनानगरमधील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या दहा गोवंश जनावरांची सुटका केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना गोपनीय बातमीदाराकडून मदिनानगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंश जनावरे बांधून ठेवलेली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या, पथकातील
पोना. राहुल डोके, पोकॉ. राहुल सारबंदे आणि शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोकॉ, विशाल कर्पे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता एका खोलीमध्ये दहा गोवंश जातीची जनावरे दाटीवाटीने व निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेली मिळून आली. त्यावेळी तेथे जावेद इसाक शेख (वय २७, रा. संगमनेर खुर्द) हा मिळून आल्याने त्यास सदरची जनावरे कोणाच्या मालकीची आहे याबाबत विचारपूस केल्यावर माझ्याच मालकीची असल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी एक लाख रुपये किमतीची जनावरे ताब्यातघेत सायखिडी येथील जीवदया गोशाळेत रवाना केली. या प्रकरणी पोना, राहुल डोके यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून जावेद शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. पारधी हे करत आहेत.
Breaking News: Ten cows freed from animal slaughter