Home अहिल्यानगर अहिल्यानगर: कार-डंपर अपघातात महिलेचा मृत्यू

अहिल्यानगर: कार-डंपर अपघातात महिलेचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: पंपाजवळ कार आणि डंपर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू.

Woman dies in car-dumper accident

कर्जत: कर्जत-राशीन रस्त्यावरील कानगुडवाडी फाट्याजवळ नायरा पेट्रोल पंपाजवळ कार आणि डंपर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (दि. ८) सायंकाळी सहा वाजता हा अपघात झाला. राशीन येथील प्रियंका शेलार (वय २७), असे मृत महिलेचे नाव आहे. सचिन बाबर (रा. जामखेड) हे गंभीर जखमी झाले.

जखमीला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्जतकडून येणारे कार आणि राशीनकडून कर्जतकडे चाललेला डंपर यांच्यामध्ये हा अपघात झाला. यामध्ये सचिन बाबर (जामखेड) आणि जयराम पारखे (बारामती) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत राशिन पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अपघात एवढा जोरात होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Breaking News: Woman dies in car-dumper accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here