अकोले तालुक्यातील १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, अपघाती की घातपात, हळदीला गेला अन…
Breaking News: Akole: तरुणाचा घातपाती मृत्यू झाल्याची घटना समोर.
अकोले: तालुक्यातील पांगरी गावातील एक १९ वर्षीय नवनाथ तुकाराम पडवळे या तरुणाचा घातपाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नवनाथ याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो उत्तीर्ण देखील झाला होता अशी माहिती नातेवाईक यांनी दिली आहे. मात्र निकालाच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नवनाथ एका हळदी समारंभासाठी सातेवाडी पळसुंदे याठिकाणी गेला होता त्यानंतर त्याचा घातपाती मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचा मृतदेह कोतूळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून त्याचे वडील अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आहे. नवनाथ याचा मृत्यू अपघाती होता की घातपात हे पोलीस तपासा अंती समोर येणार आहे.
Breaking News: 19 year old youth dies, assailant kills him