Home संगमनेर एकनाथ शिंदे यांचा शिलेदार आ. अमोल खताळ अॅक्शन मोडमध्ये, रात्रीच्यावेळी मोठी कारवाई

एकनाथ शिंदे यांचा शिलेदार आ. अमोल खताळ अॅक्शन मोडमध्ये, रात्रीच्यावेळी मोठी कारवाई

Breaking News: Sangamner Crime: वाळू चोरांना रोखताना, आमदार खताळ यांनी स्वतः रात्री वाळू चोरांचा पाठलाग केला.

Eknath Shinde's Shiledaar Aa. Amol Khatal in action mode

संगमनेर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिलेदार आमदार अमोल खताळ यांनी वाळू चोरांना थेट आव्हान दिलं आहे. वाळू चोरांना रोखताना, आमदार खताळ यांनी स्वतः रात्री वाळू चोरांचा पाठलाग केला.

वाळू चोरांना धडा शिवकण्यासाठी आता ‘रिअल अॅक्शन’ केली जाईल, असे सूचक संकेत अमोल खताळ यांनी दिले. याचबरोबर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह आमदार खताळ यांनी उपस्थित करताना, वाळू चोरांविरुद्ध पुढं आरपारची लढाई लढणार असल्याचे संकेत दिले.

संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारातील तनपुरवाडी रस्त्यावर काल रात्री आमदार अमोल खताळ सामाजिक कार्यक्रमावरून परतत असताना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्वतः कारवाई केली. आमदार खताळ यांनी वाळू चोरांविरुद्ध कारवाई केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याची संगमनेरमध्ये चर्चा होती. या कारवाईसंदर्भार आमदार खताळ यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर देखील पोस्ट शेअर केली आहे.

आमदार खताळ यांनी स्वतःचे वाहन थांबवत तात्काळ पोलिस प्रशासनाला पाचारण केले आणि संबंधित वाळू वाहतूक करणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, “मला आमदार असूनही रस्त्यावर उतरून ही कारवाई करावी लागते, मग प्रशासन झोपलंय का? संगमनेरमध्ये काही भागांमध्ये अवैध वाळू चोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हे वाळू चोर कोणाच्या छत्र छायेखाली काम करत आहेत हे सर्व तालुक्याला माहीत आहे. यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल, असा मी शब्द देतो.”

ते पुढे म्हणाले, “या चोरांमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज होते, शेतीचे नुकसान होते आणि बेफाम वाहनचालकांमुळे नागरिकांना दहशतीखाली जीवन जगावं लागत आहे. प्रशासनातील काही घटक वाळू चोरांशी हातमिळवणी करून हा व्यवसाय चालवत आहेत. पण आता याला आळा बसेल, असा विश्वास मी जनतेला देतो.”

ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी आमदारांच्या या धाडसी कृतीचे कौतुक केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला अवैध वाळू उपसा आमदार अमोल खताळ यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे थांबेल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे.

Breaking News: Eknath Shinde’s Shiledaar Aa. Amol Khatal in action mode

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here