संगमनेर: बहिणीच्या लग्नादिवशी भावाचा नदीत बुडून मृत्यू
Breaking News | Sangamner: १७ वर्षांच्या मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू (Death).
संगमनेर: १७ वर्षांच्या मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील जाखुरी परिसरातील प्रवरा नदीपात्रात काल बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाखुरी गावातील बागुल वस्ती येथे राहणाऱ्या रमेश महिपत खैरे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांचा १७ वर्षाचा मुलगा सोहम रमेश खैरे हा पाहुण्या मुलांसोबत जवळच असणाऱ्या प्रवरा नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. तेव्हा सर्व मुले नदीमध्ये आंघोळ करीत होते. मात्र, कृष्णा रमेश खैरे याला नदीच्या पाण्याचा अंदाज न त्याचा बुडून मृत्यू झाला. लग्नाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Breaking News: Sister’s Lagna Divas Bhavacha Nadit Budun Death