कॉलेज जवळ कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, दांपत्यासह तिघांना ताब्यात, महिलांची सुटका
Breaking News | Jalgaon Crime: कॉलेज जवळ अवैधपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका.
जळगावः शहरातील खेडी परिसरातील एक कॉलेज जवळ अवैधपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. दोन गिऱ्हाईक आणि वेश्या व्यवसाय चालविणारे दांपत्यासह ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती, शहरातील खेडी परिसरातील एका कॉलेजजवळ एक महिलेने वेश्या व्यवसाय करण्यासाठी काही महिलांना आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. सुरुवातीला डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालणाऱ्या दांपत्यासह 3 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि या ठिकाणी असलेले गिऱ्हाईक म्हणून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एकूण पाच संशयित आरोपी आहेत तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, इंदल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विक्की इंगळे, अमोल वंजारी, अनिल कांबळे, निलेश घुगे, काजल सोनवणे यांनी ही कारवाई केली.
Breaking News: College near Kuntankhaniyar Police raid, Tighanna along with couple