विवाहित परपुरुषाच्या प्रेमात, नंतर शरीर संबंध आणि हट्टाला पेटली तर दोघांची राख रांगोळी
Breaking News | Crime: प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर प्रियसीच्या शरीराचे तुकडे करून पिशवीत भरून गोडाऊन मध्ये लपवल्याची घटना.
छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा तगादा लावलेल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर प्रियसीच्या शरीराचे तुकडे करून पिशवीत भरून गोडाऊन मध्ये लपवल्याची घटना घडली होती. यातील आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस सी ना यांनी जन्मठेप त्यासोबतच तीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.सौरभ खंडू लाखे वय 31 राहणार शिरूर तालुका वैजापूर असे आरोपीचे नाव आहे.
नेमका प्रकार काय घडला?
सौरभ लाखे याचं पूजा (नाव काल्पनिक आहे) या तरुणी सोबत प्रेम संबंध होते. काही दिवसानंतर पूजाने सौरभकडे लग्नाची मागणी केली. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. दरम्यान 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सौरभ व त्याच्या काही मित्रांनी पूजाच्या घरी जाऊन तिचा खून केला. फोन केल्यानंतर आरोपी सौरभने तोंडाला रुमाल बांधून घराला कुलूप लावून पळ काढला. 16 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी सौरभ पुन्हा पूजाच्या घरी आला. पूजाचे मुंडके व डावा हात कापून पिशवीत भरला.
शरीराचे तुकडे असलेले पिशवी घेऊन सौरभ एम एच २० ९६४८ या क्रमांकाच्या दुचाकीने निघून गेला. सौरभने फर्निचरच्या गोडाऊनमध्ये जाऊन पिशवी लपवली. 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी सौरभ व त्याचा साथीदार पुन्हा कारने पूजाच्या घरी गेला. घरात ठेवलेले मुंडके व हात नसलेले धड कारमध्ये टाकून घेऊन जात होते. दरम्यान नाकाबंदी सुरू असताना देवगाव रंगारी च्या पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरण समोर आले.
खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी २८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात मृताची मैत्रिण, इमारतीतील दोन भाडेकरू, सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टर व पंचांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने सौरभ लाखे याला दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप व २५ हजारांचा दंड, कलम २०१ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात दोन आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली.
Breaking News: Married love between husband and wife, then physical relationship and murder