Home संगमनेर संगमनेर: थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरातांवर गुन्हा दाखल

संगमनेर: थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरातांवर गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime: थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Thorat factory director Indrajit Thoratanwar criminal case

संगमनेर:  तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचा वाद चिघळला असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, आम्हालाही सहआरोपी करा, अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सध्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे. जलसंपदा विभागाने कालव्यातील अनधिकृत पाईप काढण्यास सुरुवात केली असता, शेतकर्‍यांनी याला तीव्र विरोध केला. इंद्रजीत थोरात यांनी शेतकर्‍यांचे नेतृत्व करत प्रशासनाच्या कारवाईला आव्हान दिले. जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निमगाव पागा ते खळी पिंपरी दरम्यान अनधिकृत पाईप काढताना इंद्रजीत थोरात यांनी अटकाव केला. त्यांनी आमच्या कारखान्याने पाईप टाकले आहेत ते काढू नका. शेतकर्‍यांच्या जमिनी कालव्यासाठी गेल्या त्यांना आधी पाणी द्या, असे सांगितले. तरी देखील यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासन आणि शेतकर्‍यांमधील तणाव कसा निवळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Breaking News: Thorat factory director Indrajit Thoratanwar criminal case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here