अकोले ब्रेकिंग: कोल्हार घोटी रोडवर झाड अंगावर कोसळून एकाचा मृत्यू, वादळ वाऱ्याचा फटका
Breaking News | Akole: वादळ वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रोडला झाड अंगावर कोसळल्याने एकाचा मृत्यू. (Death)
अकोले: अकोले तालुक्यातील कळस बू येथे वादळ वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रोडला झाड अंगावर कोसळल्याने शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळ झाल्याने जोरदार वाऱ्याने कोल्हार घोटी मार्गालगत असणारे महारुक चे झाड अंगावर पडले त्यात शिवाजी वाकचौरे यांना डोक्याला मार लागला त्यांना संगमनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे आज पहाटे निधन झाले. या दुर्दैवी घटनेने कळस पंचक्रोषित हळहळ व्यक्त होत आहे.
Breaking News: Kolhar Ghoti Roadwar Jhad Angwar Karpoon Ekacha Death