Home महाराष्ट्र गुड न्यूज! मान्सून महाराष्ट्रात ‘या’ तारखेला दाखल होण्याची शक्यता

गुड न्यूज! मान्सून महाराष्ट्रात ‘या’ तारखेला दाखल होण्याची शक्यता

Monsoon Update 2025:  यंदा 2025 मध्ये मान्सून नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला.

Monsoon likely to enter Maharashtra or Tarkhela

मुंबई: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. यंदा 2025 मध्ये मान्सून नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी ही बातमी असून, शेतीसाठीही ही परिस्थिती अनुकूल ठरणार आहे.

IMD च्या अंदाजानुसार, 13 मेपर्यंत मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल. त्यानंतर 5-6 दिवसांत केरळमध्ये म्हणजेच 18-19 मे दरम्यान मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातही मान्सून 5 ते 7 जूनदरम्यान दाखल होऊ शकतो, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दरवर्षी मान्सून महाराष्ट्रात 9 ते 11 जूनच्या दरम्यान दाखल होतो. पुण्यात 10 जून तर मुंबईत 11 जून ही नेहमीची तारीख मानली जाते. मात्र यंदा मान्सूनचं आगमन लवकर होण्याच्या शक्यतेमुळे दक्षिण कोकणात 5 जूनपासून तर मुंबई-पुण्यात 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदा एल निनोचा प्रभाव नसल्यानं आणि ला निनासारखी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 105% पर्यंत राहू शकतं. त्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे.

Breaking News: Monsoon likely to enter Maharashtra or Tarkhela

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here