शिर्डीत हवेत गोळीबार, तिघांना गावठी कट्ट्यासह जेरबंद
Breaking News | Shirdi: गावठी कट्ट्यातुन हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याच्या प्रयत्न करणार्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डीत जेरबंद.
शिर्डी: गावठी कट्ट्यातुन हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याच्या प्रयत्न करणार्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डीत जेरबंद केले असून त्यांच्याकडून तीन गावठी कट्ट्यासह 2 लाख 70 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीनही आरोपीवर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध अग्नीशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती घेत असताना पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फते गणेश आप्पासाहेब शेजवळ, रा.भिमनगर, शिर्डी, याचेकडे अग्नीशस्त्र असून त्याने दहशत निर्माण करण्याकरीता हवेत गोळीबार केला असून, गोळीबार केल्याचा व्हिडीओ त्याचे मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोसई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, बाळासाहेब नागरगोजे, रोहित येमुल, प्रमोद जाधव, रमीजराजा आत्तार, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सारीका दरेकर व अरूण मोरे यांचे पथक तयार करून शिर्डीला रवाना केले. पथक संशयीत इसमाचा शोध घेत असता आरबीएल चौकाजवळ, शिर्डी याठिकाणी गणेश आप्पासाहेब शेजवळ मिळनू आला. त्याच्याकडे अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने मोबाईलमध्ये अग्निशस्त्रचा व्हिडीओ दाखवला. सदरचे अग्नीशस्त्र त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ याचेकडे ठेवले असल्याची माहिती सांगीतली. पथकाने पंचासमक्ष अजय रत्नाकर शेजवळ, याचे घरातुन 1 लाख 50हजार रूपये किमतीचे 3 गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे व 3 रिकाम्या काडतुसाच्या पुंगळया जप्त केल्या. आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ व अजय रत्नाकर शेजवळ यांचे कब्जातुन 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ याचेकडे मिळून आलेल्या गावठी पिस्टल व काडतुसाबाबत विचारपूस केली असता त्याने भाऊसाहेब साहेबराव जगताप रा.शिर्डी, राकेश पगारे, रोशन सोमनाथ कोते यांचेकडून प्रत्येकी 1 पिस्टल व दोन जिवंत काडतुसे खरेदी करून, त्यापैकी 3 काडतुसे हवेत फायर केले असल्याचे सांगीतले.पिस्टल विक्री करणार्या इसमांचा शोध घेतला असता त्यातील रोशन सोमनाथ कोते, रा.शिर्डी हा मिळून आलेला असून उर्वरीत फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे. या आरोपीविरूध्द शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 116/2024 आर्म ऍक़्ट कायदा कलम 3/25, 7, 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहेत.
Web Title: Firing in the air in Shirdi, three jailed with Gavathi Katta
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News