अहिल्यानगर: मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज
Breaking News | Ahilyanagar Rain Update: राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार आहे. त्यानुसार गुरुवारी महामुंबईत जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रात वळीवाच्या पावसाची शक्यता ११ मेपर्यंत कायम आहे. रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत याचा प्रभाव राहील.
जळगाव जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने ७३ जनावरांसह सुमारे २ हजार कोंबड्यांचा बळी घेतला. या पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव, चाळीसगाव, पारोळा तालुक्यांना बसला आहे.
चंद्रपूर वगळता संपूर्ण विदर्भ ४ ते ६, धाराशिव वगळता संपूर्ण मराठवाडा ३ ते ५, जळगाव ६.५, अलिबाग ५.८, डहाणू ५.२, कुलाबा ३.७, सांताक्रूझ २.४ डिग्रीने खालावले. तापमानाची स्थिती १२ मेपर्यंत टिकून राहील.
Breaking News: Ahilyanagar torrential rain with thunder