Home संगमनेर संगमनेर: अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी पिकअप पकडली, ८ लाख २२ हजार रुपयांचा...

संगमनेर: अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी पिकअप पकडली, ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Breaking News | Sangamner Crime: अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी पिकअप सोमवारी (ता.५) सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास घारगाव पोलिसांनी पकडली. या कारवाईत वाहनासह ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

illegal gutkha caught, goods worth Rs 8 lakh 22 thousand seized

संगमनेर : माहुली फाटा (ता. संगमनेर) येथे अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी पिकअप सोमवारी (ता.५) सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास घारगाव पोलिसांनी पकडली. या कारवाईत वाहनासह ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घारगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत, संगमनेरच्या दिशेने जाणारी एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी (क्रमांक एम.एच.१७ बी.वाय. ८५५६) थांबवून तपासणी केली असता या गाडीतून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रभाकर आण्णासाहेब गुळवे (वय ३९, रा. रणखांब, ता. संगमनेर) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (५ मे) सकाळी ११:०० वाजता पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, घारगावातून संगमनेरच्या दिशेने एका पिकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी नेला जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन माहुली फाटा येथील राजस्थान हॉटेलजवळ सापळा रचला. सकाळी ११:४५ वाजण्याच्या सुमारास घारगावकडून येणारी संशयित पिकअप गाडी दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून चालकाची ओळख विचारली असता त्याने त्याचे नाव प्रभाकर गुळवे असल्याचे सांगितले.

गाडीची तपासणी केली असता, त्यात ३,३७,०००/- रुपये किंमतीचा हिरा पानमसाला (१७६० पाकिटे) आणि ८४,४८०/-रुपये किंमतीचा रॉयल ७१७ सुगंधित तंबाखू (१७६० पाकिटे) असा एकूण ४,२१,४८०/-रुपये किंमतीचा गुटखा तसेच ४,००,०००/- रुपये किंमतीची पिकअप गाडी (एम.एच.१७ बी.वाय. ८५५६) असा एकूण ८,२२,४८०/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली असून, त्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. जप्त केलेल्या मालाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रभाकर गुळवे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, ३२८ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६ (२) (IV), २७ (३) (d), २७(३) (e), ३०(२) (a) सह वाचन कलम ३ (१) (z) तसेच शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

Breaking News: illegal gutkha caught, goods worth Rs 8 lakh 22 thousand seized

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here