HSC SSC Exam 2022: दहावी व बारावीच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई | HSC SSC Exam 2022 : १० व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. ऑफलाईन परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय आला आहे. यामुळे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० वी व १२ वीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र यावर सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला आहे. आता दहावी बारावी परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाईनच होणार आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
सुप्रीम कोर्टात ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय स्टेट बोर्ड, CBSE, ICSE आणि National Institute of Open Schooling (NIOS) या सर्वांसाठी लागू करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या याचिका या विद्यार्थ्यांना चुकीच्या आशा दाखवत असल्याची फटकारही सुप्रीम कोर्टानं लगावला आहे.
Web Title: HSC SSC Exam 2022 Supreme Court Decision