Home अहमदनगर अहमदनगर: प्रियसीचा चाकुने भोकसुन निर्घृन खून

अहमदनगर: प्रियसीचा चाकुने भोकसुन निर्घृन खून

Ahmednagar | Shirdi Crime:  लिव्ह इनमध्ये राहणार्‍या महिलेने दुसर्‍या मुलीशी लग्नाला विरोध केला. यामुळे राग आलेल्या प्रियकराने प्रियसीचा चाकुने भोकसुन निर्घृन खून  केल्याची घटना.

gruesome murder of the Beloved by stabbing her with a Knife

शिर्डी:  लिव्ह इनमध्ये राहणार्‍या महिलेने दुसर्‍या मुलीशी लग्नाला विरोध केला. यामुळे राग आलेल्या प्रियकराने सविता सुनील बत्तीशे (वय 25) या प्रियसीचा चाकुने भोकसुन निर्घृन खून  केल्याची घटना घडली आहे.  यानंतर आरोपी स्वत:च शिर्डी पोलीस ठाण्यात  हजर झाला. रूई शिवारातील भोपळे वस्तीवर ही  घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत सविता ही पहिला पती व दोन मुलांना सोडून आरोपी अजय राजेंद्र म्हस्के, रा. राम सोमय्यानगर, सावळीविहीर याचेसोबत पती-पत्नी सारखी राहत होती. रविवारी सकाळी रूई येथील भोपळे वस्तीवर अजय म्हस्के याने त्याची पत्नीचा खुन केल्याचा कॉल 112 वर आला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आपल्या पथकासह भोपळे वस्तीवर धाव घेतली. तेथे सदर महिला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेली होती. घटनास्थळावरून तिला साईबाबा रूग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ती मृत असल्याचे सांगितले.

आरोपी अजय म्हस्के हा स्वत: पोलीस स्टेशनला हजर झाला व त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अजयच्या आई-वडील त्याचे लग्न ठरवत होते. मात्र मयत सविता हिने अजयला दुसर्‍या मुलीबरोबर लग्न करण्यास विरोध केला. या कारणावरून दोघांमध्ये वादविवाद होत असल्याने सविताच्या त्रासाला कंटाळून तिचा धारदार हत्याराने भोकसून खुन केला असल्याचे अजयने पोलिसांना सांगितले.

कडू आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अजयवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 615/2023, भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पुढील तपास करत आहेत.

Web Title: gruesome murder of the Beloved by stabbing her with a Knife

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here