Earthquake shakes: संगमनेर तालुक्यात भूकंपाचे धक्के
संगमनेर: संगमनेर तालुक्यात पठार भागात असलेल्या बोटा, घारगाव, आंबी दुमाला, अकलापूर आदी भागांसह भूकंपाचे धक्का बसला. आज गुरुवारी साडे चार वाजेच्या सुमारास धक्का बसला. हा धक्का २.६ रिश्टर स्केल इतका होता.
या धक्क्याने नागरिक भयभीत झाले आहे. याबाबत नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले. यापूर्वीही अनेकदा या भागांत भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. अशा प्रकारचे नेहमीच भूकंपाचे धक्के बसत असल्याने काहीतरी उपायायोजना करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहे. या पंचक्रोशीतील नागरिकांना याबाबत पूर्वसुचना मिळावी यासाठी काही उपायोजना करणे देखील महत्वाचे आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेत कार्यवाही केली पाहिजे असे सामान्य नागरिकांचे मत आहे.
Web Title: Earthquake shakes Sangamner taluka