वाहन चालकांना लुटणारा सराईत गुन्हेगार अटकेत
अहमदनगर | Ahmednagar: महामार्गावरील वाहन चालकांना लुटमार करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवनागापूर परिसरातून अटक केली आहे.
शाहरुख सत्तार खान वय २१ रा. गजानन कॉलनी, नवनागापूर असे या आरोपीचे नाव आहे. कोल्हार बुद्रुक शिवारात किशोर मोतीराम दुकळे यास मनमाड रोडवर पंचार काढीत असताना आरोपी शाहरुख खान, किरण अर्जुन आजबे व इतर साथीदार यांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी शाहरुख खान वा नवनागापूर परिसरात असल्याची गुप्त खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चक्रे फिरवत शाहरुख खानला नवनागापूर येथून अटक केली आहे.
Web Title: Ahmednagar Criminal arrested for robbing drivers