अकोले: बुधवारी तालुक्यात ३३ व्यक्ती कोरोना बाधीत
अकोले: बुधवारी तालुक्यात लहीत बु ०५, धुमाळवाडी ०२, अकोले ०४, नवलेवडी ०५, राजुर ०४, शेंडी ०३, गणोरे ०२ सह तालुक्यात ३३ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या २४५७ झाली आहे.
आज तालुक्यात घेण्यात आलेल्या ११३ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये १९ व्यक्तीचा, खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात ०५ व अहमदनगर शासकिय प्रयोगशाळेतील अहावालात ०९ अशी ३३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तर आज अकोले ग्रामीण रुग्णालय अंतर्गत कोविड सेंटर येथून ५४ व कोतुळ ग्रामीण रुग्णालय येथून १५ अशी ६९ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात चास येथील ३१ वर्षीय पुरूष, अकोले शहरातील ४२ वर्षीय पुरूष,२७ वर्षीय तरूण, माळीझाप येथील ५५वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील ३२ वर्षीय महीला,१४ वर्षीय मुलगा, धामणगाव आवारी येथील २७ वर्षीय तरूण, नवलेवाडी येथील ४३ वर्षीय पुरूष, खानापुर येथील १७ वर्षीय तरुण अशा ०९ व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात नवलेवाडी येथील ७० वर्षीय महीला,गणोरे येथील ५५ वर्षीय महीला,६६ वर्षीय पुरूष, सुगाव बु येथील २२ वर्षीय तरुण, राजुर येथील ५९ वर्षीय महिला, अशा ०५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला
तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये विठा येथील ५५ वर्षीय पुरूष, शेंडी येथील २७ वर्षीय महीला, ०३ वर्षीय मुलगा, २९ वर्षीय तरुण, लहीत बु येथील २७ वर्षीय महीला,०२ वर्षीय मुलगी, २७ वर्षीय महीला, ९० वर्षीय महीला, २० वर्षीय तरुण, रंधा येथील ६५ वर्षीय पुरूष, अकोले शहरातील २१ वर्षीय तरुण, महालक्ष्मी कॅालणीतील २८ वर्षीय तरुण, राजुर येथील ३० वर्षीय महीला, २६ वर्षीय महीला,०५ वर्षीय मुलगी, धामणगाव येथील ६५ वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथील ५० वर्षीय पुरूष, १३ वर्षीय मुलगी, ०७ वर्षीय मुलगी अशा १९ व्यक्ती सह आज तालुक्यात एकुण ३३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
Web Title: Akole Taluka 33 Corona infected Wednesday