Home अहमदनगर अहमदनगर: महिलेने व्यवसायिकाकडून पाच लाख उकळले

अहमदनगर: महिलेने व्यवसायिकाकडून पाच लाख उकळले

Breaking News |Ahmednagar:  बनावट कागदपत्रे तयार करून महिलेने मुंबईच्या व्यावसायिकाची पाच लाखांची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर.

The woman extorted five lakhs from the businessman

अहमदनगर: बनावट कागदपत्रे तयार करून हवेली (ता. हवेली, जि. पुणे) येथील ४५ गुंठे शेत जमिनीची मालक असल्याचे भासवून श्रीरामपूरच्या महिलेने मुंबईच्या व्यावसायिकाची पाच लाखांची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर शेत जमिनीबाबत नोटरी करून पाच लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची घटना सावेडीत घडल्यामुळे येथील तोफखाना पोलीस ठाण्यात महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मंदा दगडू पाठक उर्फ मंदा अण्णासाहेब जेवरे (सध्या रा. फ्लट नंबर १६, राधेय अपार्टमेंट, कांदा मार्केट रस्ता, श्रीरामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी किरण संपत शिंदे (वय ३४ रा. कुलाबा, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. किरण शिंदे यांनी नगरमधील एका मध्यस्थी मार्फत पुणे जिल्ह्यात शेत जमीन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याच दरम्यान त्यांची मंदा दगडू पाठक माहेरचे नाव मंदा अण्णासाहेब जेवरे (मूळ रा. ममदापूर, ता. राहाता) हिच्या सोबत ओळख झाली. त्यावेळी तिने तिचे नाव कुसुम रामराव कुमदाळे असल्याचे खोटे सांगितले. त्या नावाची खोटी व बनावट कागदपत्रे बनवून त्यात या नावाने असलेली सन २००० मधील खरेदीखताची झेरॉक्स प्रत दाखविली. तसेच त्यासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्म दाखला, रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, विवाह नोंदणीचा दाखला, आई- वडिलांचे निवडणूक ओळखपत्र तसेच त्यांचे वडिल किसन कुमदाळे यांचा मृत्यू दाखला दाखवून त्यावरून ती कुसुम रामराव कुमदाळे असल्याचे भासविले.

हवेली येथे गट नंबर ४२७/२ वर ० हेक्टर ४५ आर शेत जमिनीची मालक असल्याचे पटवून सांगून खोटे बोलून किरण शिंदे यांचा विश्वास संपादन केला. सदरची शेत जमीन खरेदी करण्याच्या व्यवहारापोटी ३ मे २०२३ रोजी शिंदे यांच्याकडून नोटरी पब्लिक श्रीमती एस. एस. नगरकर, गुलमोहोर रस्ता, सावेडी येथे सदर शेत जमिनीची नोटरी करून घेतली व त्यांच्याकडून ३० हजार रुपये रोख व चार लाख ७० हजारांचा चेक घेतला.

दरम्यान शिंदे यांनी तिला फोन करून जमिनीबाबत विचारणा केली असता तीने टाळाटाळ केली. शिंदे यांनी चौकशी केली असता तिचे माहेरचे खरे नाव मंदा अण्णासाहेब जेवरे असल्याचे व ती कुसूम रामराव कुमदाळे नसून तिचा हवेली येथील शेत जमिनीशी कोणताही संबंध व मालकी हक्क नसल्याचे समजले. शिंदे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे १८ नोव्हेंबर २०२३ रोजी तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील तपास करत आहेत.

Web Title: The woman extorted five lakhs from the businessman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here