धक्कादायक! विवाहितेच्या अंगावर गरम तेल टाकून केले जखमी
Ahmednagar Crime News: विवाहितेच्या अंगावर गरम तेल टाकुन दुखापत, शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण.
राहुरी: मी दुसरे लग्न करणार आहे, असे म्हणत पतीने पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पत्नीच्या अंगावर गरम तेल टाकुन जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे २४ ऑक्टोबर रोजी घडली होती. या घटने बाबत दि. १२ डिसेंबर रोजी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.
हर्षाली ज्ञानेश्वर झावरे, रा. टाकळीमिया यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, त्यांचा विवाह टाकळीमियाँ येथील ज्ञानेश्वर अशोक झावरे याच्यासोबत झाला होता. विवाह प्रसंगी वडिलांनी संसार उपयोगी वस्तु व तीन लाख रुपये दिले होते. सन २०२२ मध्ये त्यांचे सासू सासरे व पती यांनी शारीरीक व मानसीक त्रास देण्यास सुरुवात केली. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी ज्ञानेश्वर झावरे याने पत्नी हर्षाली यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावर गरम तेल टाकुन दुखापत केली.
या घटनेनंतर हर्षाली ज्ञानेश्वर झावरे यांनी दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर अशोक झावरे, अशोक भाऊ झावरे, मनिषा अशोक झावरे, सर्व रा. टाकळीमिया, ता. राहुरी. यांच्यावर गु.र.नं. १३६२/२०२३ भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Web Title: wife was injured by pouring hot oil on her body Crime filed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App