Accident | मजूर घेऊन जाणारा टेम्पो उलटून अपघात, एक ठार आठ जखमी
Newasa | नेवासा: फळबाग तोडणेकरिता मजूर घेऊन जाणारा टेम्पो उलटून टेम्पोमधील एक जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. नेवासा बुद्रुक शिवारातील पवार वस्तीजवळ शुक्रवारी सकाळी आठ वाजता हा अपघात (Accident) घडला.
याबाबत मिरजा अजाझ बेग इकबाल बेग (वय 38 वर्ष) धंदा- फळे खरेदी विक्री रा. मोहल्ला कमान खुलताबाद ता. खुलताबाद जि. औरंगाबाद याने नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 24 रोजी सकाळी 6 वाजेचे सुमारास मी, आमीन युसूफ पठाण, मिर्झा खलील छोटु बेग, असे पुढील बाजूस व मागील बाजूस कामगार मिर्झा शाकीर बेग, युनूस बेग, मिर्झा जहीर बेग छोटु बेग, इम्रान शेख, मिर्झा फाईझ फरिद बेग, मिर्झा फरदीन बेग (सर्व रा. खुलताबाद जि. औरंगाबाद), सोयल सलीम शेख, मुक्तार शेख अहमद शेख, शेख इब्राहीम शेख (सर्व रा. दौलताबाद ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) असे आम्ही भाऊ मिर्झा इलीयास इकबाल यांचे मालकीची असलेली टाटा कंपनीचा 407 टेम्पो क्र.एमएच- 46 ई-0669 असे टेम्पोमध्ये बसून खुलताबाद जि. औरंगाबाद येथून पुनतगाव येथील नेवासा बुद्रुक शिवारातील फळबाग तोडणेकरीता नेवासा बुद्रुक ते पुनतगाव रोडने जात असताना त्यावेळी ही गाडी आमीन युसूफ पठाण हा भरधाव वेगात टेम्पो चालवित होता.
टेम्पो सकाळी आठ वाजेचे सुमारास नेवासा बुद्रुक शिवारातील शंकर पवार यांचे वस्तीसमोरील रस्त्याने जात असताना रस्त्यावर चिखल असल्याने गाडी स्लीप होऊन चालक आमीन पठाण यांचे हातून टेम्पोचा तोल जाऊन गाडी अचानक उजव्या बाजूने उलटल्याने गाडीचा अपघात झाला.
त्यामध्ये क्लिनर साईटने बसलेला मिर्झा खलील छोटु बेग हा गाडीचे खाली दबला गेल्याने त्याचे डोक्यास व तोंडावर जबर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडल्याने तसेच मला व टेम्पोचालक आमीन पठाण यास मुका मार लागून दुखापत झाल्याने ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे उपचारासाठी पाठविले. तेथे डॉक्टरांनी मिर्झा खलील छोटू बेग यास तपासले असता तो मयत असल्याचे सांगितले. तर वरील आठजण गंभीर जखमी झाले.
चालक आमीन पठाण याने टेम्पो भरधाव वेगाने चालवून पल्टी करून मिर्झा खलील छोटू बेग (वय-56 वर्ष) याच्या मृत्यूस कारणीभूत झाला. इतरांचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला आहे. या आरोपावरून टेम्पो चालकाविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गु. र. नंबर 532/22 भादंवि. कलम 04(अ, 337, 338, 427 तसेच मोटार वाहन कायदा 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शनावाखाली पोलीस नाईक तमनर पुढील तपास करत आहेत.
Web Title: Newasa One killed, eight injured in accident