पेट्रोल डिझेल दरवाढीचा पुन्हा दणका, आज वाढल्या दोन्हींच्या किमती
Petrol and diesel prices rising today:
पेट्रोलियम कंपन्यांनी आज दरात पुन्हा वाढ केली आहे. आज बुधवारी पेट्रोलमध्ये २५ पैसे तर डिझेल दरात १३ पैसेने वाढ केली आहे. या दरवाढीने मुंबईचा पेट्रोलचा भाव १०२.८२ इतका झाला आहे. मुंबईत डिझेलचा भाव ९४.८४ रुपये इतके झाला आहे.
पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा चांगलाच सपाटा लावला आहे. आत्तापर्यंत तब्बल २६ वेळा दरात वाढ केली आहे. पेट्रोल ६.३४ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये ६.६३ रुपयांची वाढ झाली आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा मागील तीन वर्षांतील सर्वोच्च दर आहेत.
कच्चा तेलाची तेजी कायम सुरु आहे. तेलाचा भाव ७३.९९ डॉलर झाला आहे.
Web Title: Petrol and diesel prices rising today