Maharashtra Budget 2022 : शिर्डी विमानतळासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा
मुंबई | Maharashtra Budget 2022 : राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.
या अर्थसंकल्पात शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आरोग्य विभागासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. तसेच यावेळी राज्यातील विमान वाहतुकीसाठीही काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा समावेश आहे. यात शिर्डी विमानतळासाठी 150 कोटी रुपयांची (budget for Shirdi Airport) घोषणा करण्यात आली आहे. शिर्डी विमानतळावरून मालवाहतुकीसाठी तसेच रात्रीच्या वाहतुकीच्या कामासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
Web Title: Maharashtra Budget 2022 budget for Shirdi Airport