अहिल्यानगर: महाविद्यालयातील निदेशकाने केला मुलीचा विनयभंग
Breaking News | Ahilyanagar Crime: एका शासकीय महाविद्यालयातील निदेशकाने मित्रासोबत बसल्याचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
अहिल्यानगर : शहरातील एका शासकीय महाविद्यालयातील निदेशकाने मित्रासोबत बसल्याचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार १० ते १५ एप्रिलदरम्यान घडला. याप्रकरणी निदेशक अमित खरडे यास कोतवाली पोलिसांनी मंगळवारी (दि. १५) रात्री ताब्यात घेतले.
महाविद्यालयातील पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. निदेशकाने पीडितेला फोन करून कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलावून घेतले. तुझा व मित्राचा एकत्रित बसलेला फोटो माझ्याकडे आहे. तो जर एचओडीला दाखविला तर तुला परीक्षेला प्रॉब्लम येऊ शकतो, असे म्हणत आरोपीने पीडितेशी गैरवर्तन केले. त्यानंतर त्याने पीडितेला कॉलेजच्या गोडावूनमध्ये मशीनच्या अडोशाला बोलावून घेतले व तिथेही गैरवर्तन करत विनयभंग केला. त्यानंतर त्याने आणखी एका अल्पवयीन मुलीचा गोडावूनमध्ये बोलावून घेत विनयभंग केला.
११२ वरून केली तक्रार
पीडितेने ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. कोतवालीचे पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिराने पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Director molested girl