धक्कादायक! तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
Breaking News | Mumbai Crime: एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नवी मुंबई: एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उरण परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३० वर्षीय आरोपी हा विवाहित असून त्याची पत्नी व लहान मुलगा गावी राहतात. खासगी वाहनावर चालक असल्याने तो उरण भागात बहिणीसोबत राहतो. आरोपीची बहीण शेजारी राहणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीला घरी खेळण्यासाठी आणत असे. शुक्रवारी खेळण्याच्या बहाण्याने आरोपीने लहानगीला आपल्याजवळ घेतले आणि लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराने घाबरलेली लहान मुलगी घरी गेल्यानंतर गुपचूप बसली. आईने विचारपूस करूनही तिने काही सांगितले नाही.
मुलीच्या आईने रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. शेजारी राहणाऱ्या तरुणाने हे कृत्य केल्याचे उघड झाल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात याची तक्रार केली. न्यायालयाने १९ मार्चपर्यंत आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.
Web Title: A three-year-old girl was sexually assaulted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study