संगमनेर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी
Breaking News | Sangamner Crime: शहरालगतच्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्या घरच्यांनाही जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना.
संगमनेर: शहरालगतच्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्या घरच्यांनाही जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कार्तिक लहू ढाकणे हा मुकदवाडी, ता. संभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर येथील राहणार आहे. त्याने सदर मुलीला वारंवार फोन करुन त्रास दिला आहे, याचबरोबर तिचे कॉलेज सुटल्यानंतर तिचे पाठीमागे जाऊन तिला थांबवून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. तु माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणून तिचा हात पकडून तिला लजा उत्पन होईल असे कृत्य देखील केले आहे. तु जर माझ्यासोबत बोलली नाही तर मी तुझ्या घरच्यांना जीवे मारुन टाकील आणि माझ्या जीवाचेही काहीतरी बरे वाईट करून घेईल’ अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी कार्तिक ढाकणे याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम कनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक फराज पटेल करत आहेत.
Web Title: Minor girl molested, family members threatened to kill
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News