Home अकोले अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट सादर, बजेटमधील 10 मोठ्या घोषणा: Budget 2025

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट सादर, बजेटमधील 10 मोठ्या घोषणा: Budget 2025

Budget 2025: अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे 12 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.

Budget 2025 update

Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपण सादर करत असणारं अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचं असल्याचं अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना सुरुवातीलाच एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. आमच्या अर्थसंकल्पाचं ध्येय हे GYAN वर लक्ष केंद्रीत करणारं आहे. GYAN म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता आणि नारीशक्ती, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मध्यमवर्गीयाचं जीवनमान उंचावेल हेच आमचं ध्येय असल्याचं अर्थमंत्री सीतारमण यावेळी म्हणाल्या. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

काय आहेत बजेटमधील 10 महत्त्वाच्या घोषणा जाणून घ्या.

  • आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे 12 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.
  • प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा केली. सर्व राज्यांसह केंद्र सरकार ही योजना अंमलात आणेल, असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल, असं सीतारमण यांनी सांगितलं.
  • गरीब, युवा, महिला आणि शेतकरी यांचं जीवनमान उंचावेल याकडे आमचा फोकस असणार आहे. फार्म ग्रोथ, ग्रामीण विकास, मैन्युफॅक्चरिंग याकडे आमचं विशेष लक्ष असेल. त्यासोबतच आम्ही फायनान्शियल सेक्टरच्या रिफॉर्मवर आमचं लक्ष असेल. देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजनेची सुरुवात होत आहे. यासोबतच किसान क्रेडिट कार्डची लिमिट वाढवण्यात आली असून आता ती 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे.
  • विकासाला गती आणायची, सर्वसमाविष्ट आणि सुरक्षित विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देणं, भारताच्या मध्यवर्धीयांची आर्थिक शक्ती वाढवणं याकडे अर्थसंकल्पाचं विशेष ध्येय असल्याचं अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या.

3) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी डाळींसाठी देखील विशेष योजनेची घोषणा केली. याबाबत आत्मनिर्भरता यावी म्हणून अर्थमंत्र्यांनी डाळींसाठी सहा वर्षांच्या विशेष मिशनची घोषणा केली.

4) पुढच्या सहा वर्षांसाठी मसूर, तूर सारथ्या डाळींच्या उत्पादनावर आमचं फोकस असेल. कापसाचं उत्पादन वाढावं यासाठी आम्ही 5 वर्षांचा मिशन आखलं आहे. यामुळे देशाच्या कापड व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

5) बिहारमध्ये मखाना बोर्ड बनवलं जाईल. त्याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल.

6) छोट्या उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड जारी केलं जाईल. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षा 10 लाख कार्ड जारी केले जातील, असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.

7) एमएसएमई सेक्टरचा विकास करणार : अर्थमंत्र्यांनी यावेळी एमएसएमई सेक्टरच्या विकासासाठी देखील योजना जाहीर केली. देशात 1 कोटी पेक्षा जास्त रजिस्टर्ड एमएसएमई आहेत. यातून कोट्यवधी नागरिकांना रोजगार मिळाला आहे. यातून भारत एक मॅन्युफॅक्चरिंग हेड बनतो. त्यामुळे त्यांना जास्त लाभ मिळावा यासाठी या सेक्टरलाही चालना दिली जाणार आहे. यातून तरुणांना रोजगार मिळेल. आम्ही क्रेडिट गॅरंटी कव्हरला मायक्रो आणि स्मॉल एंटरप्रायजेससाठी 5 कोटींनी वाढवत 10 कोटी करत आहोत, अशी मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

8) उडान योजनेची घोषणा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उडान योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार 120 नव्या शहरांना जोडणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार 120 विमानतळ बनवणार आहे.

9) केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी मत्स्य पालन करणाऱ्या मासेमारींसाठी देखील महत्त्वाची घोषणा केली. त्यामुळे मासेमारांसाठी देखील त्याचा फायदा होणार आहे.

10) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्टार्टअप्ससाठी फंड देण्याचं जाहीर केलं. केंद्री सरकारने स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटींचं योगदान देण्याचं निश्चित केलं आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. तसेच 5 लाख महिला, तसेच केंद्री सरकार पहिल्यांदाचएससी आणि एसटी उद्योजकांना 2 कोटी रुपयांचे कर्ज देणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Web Title: Budget 2025

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here