पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा प्रताप! स्वतः च्या अपहरणाचा केला बनाव अन…
Breaking News | Jalna Crime: एका तरूणीनं पालक रागावले म्हणून स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. Kidnapping
जालना: जालन्यातील अंबड येथील एका तरूणीनं पालक रागावले म्हणून स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. नंतर पोलिसांसमोर कबूलही केलं. तरूणी पोलीस भरतीची तयारी करत होती. मात्र, पालक रागवले म्हणून तिनं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच तारंबळ उडाली.
जालन्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणीनं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. पालक रागावले म्हणून तिनं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचं स्पष्ट केलं. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जालन्यातील सेल पोलिसांना काल रात्री एक फोन आला होता. ‘माझ्या मैत्रिणीचे अपहरण करण्यात आले आहे. तिला वाचवा’. तरूणीचं बोलणं एकूण पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. जालना पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी कसून तपास केला.
पोलिसांच्या तपासात तरूणी अहिल्यानगर येथे सापडली. तिला अहिल्यानगरमधून ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तरूणीची चौकशी केली. चौकशीमध्ये तरूणीनं पालक रागावले असल्यानं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचं कबूल केलं. मात्र तरुणीने असे का केले याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: she faked his own kidnapping
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News