अहिल्यानगर: चिमुकलीवर अत्याचार, आरोपीस अटक
Breaking News | Ahilyanagar: एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना.
श्रीरामपूर: तालुक्यात एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. संजय दगडू गांगुर्डे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आरोपीने पिडित मुलीला झाडाजवळ ओढत नेऊन तिच्या गुप्त अंगांना स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य करून तिच्यावर अत्याचार केला. त्यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री.ठोंबरे करत आहे.
Web Title: Child girl abused accused arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News