लग्नाला दोन वर्ष, मर्चंट नेव्हीतला नवरा टचही करेना; धक्कादायक प्रकार समोर
Pune Crime: नवरा नपुंसक असल्याची धक्कादायक बाब समोर आली. संताप अनावर होऊन विवाहित महिलेने तक्रार दाखल.
पुणे : चांगलं स्थळ मिळालं म्हणून आई-वडिलांनी घाईत मुलीचं लग्न उरकून टाकलं, परंतु लग्नानंतर नव नवरा नपुंसक असल्याची धक्कादायक बाब समोर आली. संताप अनावर होऊन विवाहित महिलेने तक्रार दाखलरा मुलगा बायकोला साधा स्पर्शही करत नव्हता. त्यामुळे बायकोने सत्याची पडताळणी केली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण केली. त्यानंतर संबंधित नवरदेवावर गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या उच्च शिक्षित कुटुंबातील मर्चंट नेव्हीमधील मुलाचं स्थळ एका उच्चशिक्षित डिझायनर मुलीला मिळालं. मुलगा मर्चंट नेव्हीत असल्यामुळे सहा महिने बोटीवर आणि सहा महिने घरी, असा प्रकार. साहजिक पती घरी आल्यावर विवाहितेची रोमान्स करण्याची तीव्र इच्छा होत असे. परंतु पती तिला टचही करीत नव्हता.
काही दिवसांनी सर्वकाही सुरळीत होईल, अशा आशेवर या महिलेने काही दिवस काढले. मात्र, पतीच्या वागण्यात फरक पडेना. त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता आपला पती ‘नपुंसक’ असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिला धक्काच बसला. काही काळ लोकलज्जेस्तव शांत बसलेल्या या महिलेने पती आणि त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा सर्व प्रकार कोथरुडमधील एका आलिशान सोसायटीमध्ये २९ डिसेंबर २०१५ ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत घडला. या प्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दाखल केली असून तिच्या ३७ वर्षीय पती, ६४ वर्षीय सासू, ६६ वर्षीय सासरे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ४१७, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित विवाहिता मुळशी तालुक्यातील एका गावामधील शेतकरी कुटुंबातील आहे. तर, आरोपी पतीचे कुटुंबीय बाणेर भागात एका आलिशान सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. सासू सासरे देखील उच्च शिक्षित असून गर्भश्रीमंत आहेत. फिर्यादीचा पती ‘मर्चंट नेव्ही’मध्ये कॅप्टन आहे.
पीडित विवाहितेचे आरोपीसोबत २९ डिसेंबर २०१५ रोजी लग्न झाले होते. हे लग्न दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने झालेले होते. लग्नानंतर काही दिवस असेच गेले. या काळात संबंधित महिलेला पतीच्या वागण्याविषयी शंका आलेली नव्हती. तसेच, त्याचे विचित्र वागणे देखील लक्षात आलेले नव्हते.
पती तिच्याजवळ जाण्यास किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास टाळाटाळ करीत होता. सहा महिन्यांपर्यंत असा प्रकार सुरू होता. दरम्यान, पती ‘मर्चंट नेव्ही’मध्ये नोकरीस असल्याने तो सहा महिने घरी आणि सहा महिने बोटीवर असायचा. त्यामुळे तिने स्वत:चीच समजूत काढली. काही दिवसांनी त्याच्या वागण्याचे कारण शोधण्याचा तिने प्रयत्न सुरू केला. कदाचित पतीच्या इच्छेविरूद्ध लग्न लावण्यात आलेले असावे किंवा पतीला आपण आवडत नसू अशी तिची समजूत झाली.
परंतु, दोन वर्ष उलटल्यानंतर देखील त्यांच्यामध्ये काहीच न घडल्याने तिची शंका बळावली. तिने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आपला पती नपुंसक असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने माहेराला जाऊन आईवडिलांशी याविषयी चर्चा करण्याचा विचार केला. मात्र, त्याच वेळी तिच्या मोठ्या भावाचे घटस्फोटाचे प्रकरण सुरू झालेले होते.
आई वडिलांना माहित असून दिली नाही माहिती
भावापाठोपाठ मुलीचा देखील संसार मोडतोय या विचाराने आई वडिलांना त्रास होईल असा विचार करून तिने याविषयी माहेरी वाच्यता करण्याचे टाळले. दरम्यान, तिने एक दिवस सासू सासरे यांच्यासोबत याविषयी चर्चा केली. तसेच, त्यांना पतीच्या वागण्याविषयी कल्पना दिली. त्यावेळी आणखी धक्कादायक माहिती तिला समजली. तिच्या सासू सासऱ्यांना आपला मुलगा ‘नपुंसक’ असल्याची माहिती होती.
Web Title: After two years of marriage, the merchant navy was not even touched
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News