Home बीड “धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा भरला, आता तरी…” तृप्ती देसाई आक्रमक

“धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा भरला, आता तरी…” तृप्ती देसाई आक्रमक

Dhananjay Mundhe: राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टानं दिला आहे. तर, करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रूपये पोटगी देण्याचे आदेशही कोर्टानं दिले.

Dhananjay Munde's sin bucket is full, even now Tripti Desai aggressive.jpeg

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टानं दिला आहे. तर, करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रूपये पोटगी देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. कोर्टाच्या निकालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मुंडे यांच्या पापाचा घडा भरला असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे.

मागील काही महिन्यांपासून धनंजय मुंडे हे चांगलेच वादात अडकले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीशी असलेल्या संबंधावरून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर, काही दिवसांपूर्वीच कृषी मंत्री असताना त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आता करुणा शर्मा यांच्या याचिकेवर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे.

माध्यमांशी बोलताना तृप्ती देसाई यांनी सांगितलं की, करुणा शर्मांना न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. करुणा शर्मा वारंवार सांगत होत्या मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. माझ्यावर घरगुती हिंसाचार झाला आहे. मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. मला खर्च दिला जात नाही. कोणतीही दखल घेतली नसल्याने त्या न्यायालयात गेल्या. कोर्टाने आज त्यांना न्याय दिला असून धनंजय मुंडेंनी आता तरी आरोप मान्य केलं पाहिजे असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले.

तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, धनंजय मुंडेंनी राजकीय दबावापोटी आणि पदाचा गैरवापर करत अनेक कृत्य केली आहेत. मला वाटतं आता पापाचा घडा भरत आला आहे. खंडणी प्रकरणातही मुंडेंचीच माणसं आहेत. संतोष देशमुख हत्या झाली त्यात वाल्मिक कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे, हे सर्वांना माहीत आहे. मुंडे यांनी आता नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.

Web Title: Dhananjay Munde’s sin bucket is full, even now…” Tripti Desai aggressive

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here