अल्पवयीन मुलीवर वर्गशिक्षिकाचा अत्याचार, शिक्षकाची विद्यार्थिनीवर वाईट नजर अन…
Jalna Crime News : एका शिक्षकाने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.
जालना: जालन्यामध्ये एका शिक्षकाने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही विद्यार्थिनी इयत्ता चौथीमध्ये शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वर्गशिक्षकावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील शेवगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा अत्याचाराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी वर्गशिक्षकाला बेदम चोप दिला आणि मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा तपास मौजपुरी पोलीस करत आहेत.
जालन्यातील शेवगा गावात एका चौथीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिच्या वर्गशिक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षकाच्या विरोधात मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये पॉस्कोसह इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकावर निलंबन करण्याची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. शिक्षकाविरोधात गावात संताप व्यक्त होत आहे.
Web Title: A class teacher abused a minor girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News