Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मालवाहू ट्रक हॉटेलमध्ये घुसला; हॉटेलचालक ठार

अहिल्यानगर: मालवाहू ट्रक हॉटेलमध्ये घुसला; हॉटेलचालक ठार

Breaking News | Ahilyanagar Accident:  हॉटेल चालकाचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Accident cargo truck rammed into the hotel Hotelier killed

अहिल्यानगर: छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपुल परिसरात वारंवार होणार्‍या अपघातांची मालिका टाळण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणार्‍या हॉटेल चालकाचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 5) पहाटे घडली. पांढरीपूल  घाटाच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसुन झालेल्या अपघातात हॉटेल राधेश्यामचे मालक बंडू गणपत भवार ( वय 50 रा. पांढरीपूल, वांजोळी ता. नेवासा ) यांचा मृत्यू झाला. याबाबत सोनई पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  अहिल्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरकडे लोखंडी चुरा घेऊन जाणार्‍या ट्रकचालकाचे (क्र. एम.एच. 41 जी. 7017) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक (Truck) रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. हॉटेल मातोश्री व हॉटेल राधेश्याम भेळ सेंटर या दोन हॉटेलचे मोठे नुकसान झाले. पहाटे साडेपाचच्या सुमारास बंडू भवार आपल्या हॉटेलमध्ये आवराआवर करत असताना ट्रक अंगावर आल्याने त्यांचा मृत्यू (Death) झाला. ट्रकने हॉटेल मातोश्रीपासून तीन मोटरसायकल फरफटत नेत हॉटेल राधेशामच्या भिंतीला जाऊन जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकींचे (Bike) देखील मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी पथकासह दाखल झाले.

दरम्यान, पांढरीपुल येथील अपघातांची मालिका टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

Web Title: Accident cargo truck rammed into the hotel Hotelier killed

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here