दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी साई संस्थान अलर्ट मोडवर, कर्मचाऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Shirdi Murder Case New Decision Sansthan: संस्थान कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या वेळेत बदल करत आता सोयीस्कर वेळेत ड्युटी करता येणार.
शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीमध्ये सोमवारी पहाटे साई संस्थांनच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर साई संस्थान प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शिर्डी साईबाबा संस्थान कर्मचारी यांच्या ड्युटी वेळेत बदल करण्यात आला आहे.
आज मंगळवार पासून कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेळेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने मोठे पाऊल उचलले आहे. संस्थान कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या वेळेत बदल करत आता सोयीस्कर वेळेत ड्युटी करता येणार आहे. पहाटे ४ ऐवजी आता सकाळी ६ वाजता ड्युटी सुरू होणार असून नवीन वेळापत्रकाची आज पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे. मयत संस्थान कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करणार विमा पॉलिसीसह सगळ्या मदत मिळवून देणार असल्याचे गोरक्ष काडिलकर म्हणाले आहेत.
साई संस्थानने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना विविध सेवा सुविधा पुरविणे तसेच संस्थानमार्फत कार्यान्वित असलेल्या वैद्यकिय व इतर सेवा सुविधा पुरविण्यासाठी संस्थानचे विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेगवेगळया शिफ्टमध्ये कामाचे नियोजन करण्यात आले आहे. बहुतांश कर्मचारी हे दूर गावांमधून कामावर येतात. त्यासाठी त्यांना रात्रीचा प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Web Title: Shirdi Sai Sansthan on alert mode after double massacre
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News