शिर्डी दुहेरी हत्याकांडातील पसार आरोपीही जेरबंद
Shirdi Double Murder Case: शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचार्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाने शिर्डी हादरून गेली.
शिर्डी: शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील पसार आरोपी राजू उर्फ शाक्या माळी याच्या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकाने शहरातील काटवनात लपून बसलेल्या आरोपी माळी यास मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचार्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाने शिर्डी हादरून गेली होती. या प्रकरणी एक आरोपी सोमवारी जेरबंद केला होता तर दुसरा आरोपी राजू उर्फ शाक्या माळी पसार झाला होता. शिर्डी परिसरातच तो पोलिसांना चकवा देत होता.
अखेर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने काटवनात शिर्डीत लपून बसलेल्या आरोपीला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पकडले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
Web Title: accused in Shirdi double murder also jailed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News