Home पुणे धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Suicide: एका विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

12th student committed suicide by hanging herself

लोणी काळभोर : बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली असून आज मंगळवारी (ता. 4) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. दिशा बाबासाहेब आखाडे (वय 19, रा. थेऊर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिशा ही मंगळवारी दुपारच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये गेली होती. चार वाजले तरी तीने दरवाजा उघडला नव्हता. म्हणून दिशाची आई व छोटी बहिण दार उघडण्यासाठी आवाज देत होते. त्यानंतर त्यांनी जोरजोराने दरवाजा वाजविला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दिशाच्या आईने व बहिणीने जोराने दरवाजा ढकलला. तेव्हा दरवाजा उघडला. बेडरूममध्ये जाऊन पहिले असता, दिशाने साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस मित्र संतोष गायकवाड व राहुल गायकवाड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने दिशाला खाली काढले. व लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दिशाचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहे. 

Web Title: 12th student committed suicide by hanging herself

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here