अहिल्यानगर: महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar: महिलेने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या.
जामखेड : तालुक्यातील पिंपळगाव ठंडा येथील गीतांजली आश्रू (बाळू) गव्हाणे, वय ४२ वर्षे या महिलेने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महतेचे कारण अद्याप समजु शकले नसले तरी आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकां कडुन सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव उंडा येथील गीतांजली आश्रू (बाळू) गव्हाणे या आपल्या कुटुंबासमवेत पिंपळगाव उंडा येथे रहात होत्या. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती असून शेतात पतीसोबत त्या शेती करत होत्या. गीतांजली गव्हाणे यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मंगळवार दि.२२ एप्रिल रोजी दुपारी गीतांजली गव्हाणे यांनी शेजारच्या गावात सासरी रहात असलेल्या आपल्या मुलीला व जावई यांना फोन करून मी आत्महत्या करणार आहे आसे सांगितले होते. यानंतर पिंपळगाव सोनेगाव रस्त्याच्या डाव्या बाजुला काही
अंतरावरील एका झाडाला दुपारीर वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वानंतर त्यांची विवाहित मुलगी व जावई पिंपळगाव उंडा या ठिकाणी आले व जावई व मुलीने आईचा शोध घेतला असता त्यांना शेतात जाऊन आत्महत्या केली असल्याचे समजले. गीतांजली गव्हाणे यांना तातडीने जामखेड येथील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले त्यावेळी डॉक्टरांनी त्या मयत झाल्या असल्याचे सांगितले. यानंतर खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सय्यद व गणेश बडे यांनी पंचनामा केला. त्यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयत गीतांजली गव्हाणे यांच्या मागे पती, एक अकरा वर्षाचा मुलगा, दोन मुली (एक मुलगी विवाहित) असा परीवार आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सय्यद हे करीत आहेत.
Web Title: Woman commits suicide by hanging