अहिल्यानगर जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर
Breaking News | Ahilyanagar: जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यात विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप करण्यात आले.

अहिल्यानगर: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरणारी गट आणि गणांची आरक्षण सोडत आज (दि. १३ ऑक्टोबर) रोजी पार पडली. जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यात विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप करण्यात आले आहे.
या सोडतीनुसार खुल्या प्रवर्गासाठी २९ गट राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच अनुसूचित जमातींसाठी ९ गट, अनुसूचित जातींसाठी ७ गट आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी २० गट राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित गट महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी नियमानुसार राखीव आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय जिल्हापरिषद गटांचे आरक्षण
अकोले
१) समशेर पूर : अनुसूचित जमाती
२) देवठाण : अनुसूचित जमाती महिला
३) धामणगाव आवारी : सर्वसाधारण महिला
४) राजूर : अनुसूचित जमाती
५) सातेवाडी : अनुसूचित जमाती महिला
६) कोतुळ : अनुसूचित जमाती
संगमनेर
७) सामनापूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
८) तळेगाव : सर्वसाधारण महिला
९) आश्वी बुद्रूक : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१०) जोर्वे : नागरिकांचा मागास प्रवर्ग
११) गुलेवाडी : सर्वसाधारण पुरुष
१२) धांदरफळ बुद्रूक : सर्वसाधारण
१३) चंदनापुरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
१४) बोटा : अनुसूचित जमाती महिला
१५) साकूर : सर्वसाधारण
कोपरगाव
१६) सुरेगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१७) ब्राम्हणगाव : सर्वसाधारण पुरुष
१८) संवत्सर : सर्वसाधारण पुरुष
१९) शिंगणापुर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
२०) पोहेगाव बु. : सर्वसाधारण महिला
राहाता
२१ ) पुणतांबा : अनुसूचित जाती
२२) वाकडी : अनुसूचित जाती
२३) साकुरी : अनुसूचित जाती महिला
२४) लोणी खु : नागरिकांचा मागास प्रवर्ग
२५) कोल्हार बु : सर्वसाधारण
श्रीरामपूर
२६) उंदीरगाव : अनुसूचित जाती महिला
२७) टाकळीभान : सर्वसाधारण महिला
२८) दत्तनगर : अनुसूचित जाती
२९ ) बेलापूर : अनुसूचित जाती महिला
नेवासा
३०) बेलपिंपळगाव : सर्वसाधारण महिला
३१) कुकाणा : सर्वसाधारण महिला
३२) भेंडा बु : सर्वसाधारण पुरुष
३३) भानसहिवरे : सर्वसाधारण पुरुष
३४) खरवंडी : सर्वसाधारण महिला
३५) सोनई : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
३६) चांदा : सर्वसाधारण महिला
शेवगाव
३७) दहिगाव ने : सर्वसाधारण पुरुष
३८) बोधेगाव : सर्वसाधारण पुरुष
३९) भातकुडगाव : अनुसूचित जाती महिला
४०) लाडजळगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग
पाथर्डी
४१) कासार पिंपळगाव : सर्वसाधारण पुरुष
४२) भालगाव : सर्वसाधारण पुरुष
४३) तिसगाव : सर्वसाधारण पुरुष
४४) मिरी : सर्वसाधारण महिला
४५ ) टाकळीमानूर : सर्वसाधारण महिला
नगर
४६) नवनागपुर : सर्वसाधारण महिला
४७) जेऊर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
४८) नागरदेवळे : अनुसूचित जाती महिला
४९) दरेवाडी : अनुसूचित जाती महिला
५०) निंबळक : नागरिकांचा मागास प्रवर्ग
५१) वाळकी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
राहुरी
५२) टाकळीमिया : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५३) ब्राह्मणी : सर्वसाधारण
५४) गुहा : सर्वसाधारण पुरुष
५५) बारगाव नांदूर : अनुसूचित जमाती महिला
५६) वांबोरी : सर्वसाधारण महिला
पारनेर
५७) टाकळी ढोकेश्वर : सर्वसाधारण महिला
५८) ढवळपुरी : सर्वसाधारण महिला
५९) जवळा : नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
६०) निघोज : नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
६१) सुपा : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
श्रीगोंदा
६२) येळपणे : सर्वसाधारण पुरुष
६३) कोळगाव : सर्वसाधारण पुरुष
६४) मांडवगण : सर्वसाधारण महिला
६५) आढळगाव : सर्वसाधारण महिला
६६) बेलवंडी : सर्वसाधारण पुरुष
६७) काष्टी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
कर्जत
६८) मिरजगाव : सर्वसाधारण पुरुष
६९) चापडगाव : सर्वसाधारण महिला
७०) कुळधरण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
७१) कोरेगाव : सर्वसाधारण महिला
७२) राशीन : नागरिकांचा मागास प्रवर्ग
जामखेड
७३) साकत : सर्वसाधारण पुरुष
७४) खर्डा : सर्वसाधारण पुरुष
७५) जवळा : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
Breaking News: Ahilyanagar Zilla Parishad reservation release announced
















































