Breaking News | Nashik Crime: साधूच्या वेशातील इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) :रिंगरोडजवळ साधूच्या वेशातील इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रभाकर सदाशिव घोटे (५२) असे मृत इसमाचे नाव असून, बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सोमवारी (दि. २१) सकाळी भगवे वस्त्र परिधान केलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यास काही तरुणांकडून मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी संशयित वाळू पांडुरंग कसबे (रा. पावन गणपती मंदिराजवळ), अजय ऊर्फ चिक्या दत्तू गमे (रा. पत्र्याचा पाडा, पठारवाडी, मेटघर किल्ला) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Breaking News: Death of Isma in the guise of a monk