अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Breaking News | Rain Update: मुंबईत आजपासून तीन दिवस सरींचा अंदाज.

मुंबई : राज्यातून मान्सून माघारी परतत असतानाच रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने गुरुवारी ‘यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे. तर मुंबईत गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पावसाची शक्यता आहे.
पावसाची शक्यता कधी आणि कुठे ?
गुरुवारी: जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पश्चिम छत्रपती संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
शुक्रवारी : बुलढाणा, धुळे, नाशिक सह्याद्री घाटमाथा, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली
शनिवार : सह्याद्री घाटमाथा, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव रविवार : नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली
दरवर्षी मान्सून साधारणतः देशाभरातून १५ ऑक्टोबरदरम्यान बाहेर पडतो. एक-दोन दिवसांत देशाच्या उर्वरित ५ टक्के भूभागावरून मान्सून काढता पाय घेईल. २० ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
Breaking News: Possibility of severe weather, yellow alert for 13 districts
















































