अश्लील फोटो अन् अपमान…… 19 वर्षांच्या तरुणीने संपवलं आयुष्य
Breaking News Virar Crime: विरारमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी विरार येथील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती, आता एका विद्यार्थिनीनी इमारतीवरुन उडी घेत जीवन संपवल्याचे समोर.

विरार: काही दिवसांपूर्वी विरार येथील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सोमवारी आणखी एका विद्यार्थिनीनी इमारतीवरुन उडी घेत जीवन संपवल्याचे समोर आले आहे. विवा कॉलेजची विद्यार्थिनी ऋचा पाटील हिने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ऋचा हि बीकॉमच्या शेवटच्या वर्गात शिकत होती. तर, विरारच्या नाना नानी पार्क येथे राहत होती.कॉलेजमधीलच एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र त्या मुलानेच तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा हा सगळा प्रकार असह्य झाला तेव्हा तिने वडिलांना मुलाबद्दल सांगितले. वडिलांनी कॉलेजमध्ये जावून संबंधित तरुणाला जाब विचारला.तेव्हा संतापलेल्या मुलाने काही मुलांना आणून ऋचाच्या वडिलांना मारहाण केली.
संबंधित मुलाविरोधात ऋचाने कॉलेडच्या प्राचार्यांकडेदेखील तक्रार केली होती. मात्र त्यांनी मुलांवर कोणतीही कारवाई न करता फक्त समज देऊन त्यांना सोडलं होतं. तेव्हा पुन्हा एकदा मुलाने कॉलेजच्या बाहेर येऊन तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. प्रियकरानेच अश्लील फोटोंच्या आधारे केलेले ब्लॅकमेल अन् वडिलांना झालेली मारहाण या सगळ्या प्रकारामुळं ती खचली होती.
13 ऑक्टोबर रोजी वडिल घरातील दुसऱ्या कामात व्यस्त असताना तिने घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. ऋचाला तात्काळ बंगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Breaking News: Obscene photos and insults… 19-year-old girl suicide
















































