Home रायगड लाल इश्क ! गर्लफ्रेंडला मंदिराबाहेर बोलावलं, आधी हातोड्याने ३ तास मारलं; मग...

लाल इश्क ! गर्लफ्रेंडला मंदिराबाहेर बोलावलं, आधी हातोड्याने ३ तास मारलं; मग दगडाने ठेचलं

Breaking News | Raygad Crime: तरुणाने गर्लफ्रेंडच्या डोक्यामध्ये हातोडा मारत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना.

Girlfriend called out of temple, first beat her with a hammer

रायगड: मध्ये तरुणाने गर्लफ्रेंडच्या डोक्यामध्ये हातोडा मारत तिला जीवे मारण्याचा (Dead) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडच्या अलिबागमध्ये ही घटना घडली. गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याच्या संशयावरून या तरुणाने तिच्यावर हल्ला केला. मंदिराबाहेर तब्बल ३ तास हा तरुण गर्लफ्रेंडचा छळ करत होता. तिच्या डोक्यावर हातोड्याने वार करतच राहिला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गर्लफ्रेंडचं दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. अलिबागच्या कनकेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. सूरज बुरांडे (२८ वर्षे) असं आरोपी तरुणाचे नाव आहे. हा तरुण अलिबागच्या वरसोलपाडा थेरॉड बाजारपेठमध्ये राहतो. शुक्रवारी हे दोघेजण एकमेकांना भेटले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर सूरजने हातोड्याने गर्लफ्रेंडवर अनेकदा वार केले. तब्बल ३ तास तो तिच्यावर वार करत होता.

गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याच्या संशयावरून रागाच्या भरात सूरजने हे धक्कादायक कृत्य केले. दोघेही मंदिर परिसरात एका झाडाच्या खाली गप्पा मारत बसले होते. सूरजने तू फोनवर कुणासोबत बोलते. त्या तरुणाबद्दल त्याने गर्लफ्रेंडला जाब विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सूरजने बॅगेत आणलेला हातोडा बाहेर काढून गर्लफ्रेंडच्या डोक्यावर आणि कपाळावर मारू लागला.

ऐवढ्यावर न थांबता तो गर्लफ्रेंडला खेचत घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेला. त्याठिकाणी त्याने दगडाने तिला मारहाण केली. या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली. जखमी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

Breaking News: Girlfriend called out of temple, first beat her with a hammer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here