आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, 20 वर्षीय पीडिता गर्भवती राहताच…
Breaking News | Chatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; ओळखीनंतर जवळीक वाढली अन्..; 20 वर्षीय पीडिता गर्भवती राहताच…

छत्रपती संभाजीनगर| पडेगाव परिसर : एका वीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यात पीडिता गर्भवतीही राहिली. तिची रविवारी (ता. १२) प्रसूतीही झाली. यानंतर याप्रकरणी तरुणावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. सागर दिलीप बेलकर (वय २५, रा. शिवपुरी कॉलनी, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकाराबाबत २० वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार, शहरातील पडेगाव परिसरात पीडिता ही तिच्या आई सोबत राहते. येथे एक छोटेसे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवते. दोन वर्षांपूर्वी तिची सागर नावाच्या तरुणाशी ओळख झाली.
ओळखीनंतर त्यांच्यातील जवळीक वाढली. त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. यानंतरही त्याने तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेशी लग्नासाठी विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरवात केली. संबंधातून तिला गर्भधारणा झाल्याचे तिने सागरला सांगितले. यानंतर सागरने तिच्याशी संबंध तोडले.
यादरम्यान घाटी रुग्णालयात रविवारी सकाळी सातला तिची प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. यानंतर पीडितेच्या जबाबावरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव करीत आहेत.
Breaking News: Young woman raped by luring her, 20-year-old victim becomes pregnant
















































