Home अहिल्यानगर अहिल्यानगर: राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा

अहिल्यानगर: राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा

Breaking News | Ahilyanagar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा.

Ahilyanagar NCP district president resigns

अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, फाळके यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना सादर केलेल्या पत्राव्दारे आपला राजीनामा दिला आहे.

आपल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, खा. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी 2018 मध्ये जिल्हाध्यक्ष पदभार स्वीकारला होता. जवळपास सात वर्षे मी पक्ष संघटन बळकटीसाठी काम केले. आता नवीन चेहर्‍याला संधी देण्यासाठी तसेच वैयक्तिक कौटुंबिक कारणास्तव मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

Breaking News: Ahilyanagar NCP district president resigns

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here