ब्रेकअपच्या रागातून इन्स्टाग्रामवर व्हायरल केला आंघोळीचा व्हिडीओ
Breaking News | Pune Crime: २१ वर्षीय तरुणीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार.
पुणे : प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरून २१ वर्षीय तरुणीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धनकवडी परिसरात राहणाऱ्या जुनेद शकील मोमीन (वय २१, रा. अहमदनगर) याच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (video of a bath went viral on Instagram )
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर प्रकार फेब्रुवारी २०२२ ते १७ जानेवारी २०२४ यादरम्यान घडला आहे. याबाबत धनकवडी परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलिसांना फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, तक्रारदार तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे होते. आरोपीने तरुणीला आंघोळ करताना व्हिडीओ कॉल करण्यास सांगून त्याचे रेकॉर्डिंग केले होते.
पुढे त्यांच्यात ब्रेकअप झाल्याने आरोपीने त्याचा राग मनात धरून इनस्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून त्यावरून तरुणीचा हा व्हिडीओ व्हायरल केला. याप्रकरणी जुनेद शकील मोमीन याच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक देशमाने हे करत आहेत.
Web Title: video of a bath went viral on Instagram out of anger over a breakup
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study