Home अहमदनगर ५० हजारांची लाच घेताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

५० हजारांची लाच घेताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

Ahmednagar News: वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Talathi in the net of bribery while accepting a bribe of 50,000

अहमदनगर : नगर तालुक्यातील शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. निकिता जितेंद्र शिरसाठ, खासगी मदतनिस संकेत रणजीत ससाणे या दोघांवर कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार यांचे मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्कसोड नोंद करण्यासाठी श्रीमती शिरसाठ, तलाठी सजा शेंडी यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबतची त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता यातील तलाठी शिरसाठ यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे जमिनीच्या खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील मिळकतीची हक्कसोड नोंद करण्यासाठी ५० हजारांची लाचेची मागणी करून ती रक्कम त्यांचे खाजगी मदतनीस संकेत रणजीत ससाणे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर, नगर छत्रपती संभाजीनगर रोड येथे संकेत ससाणे याने तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष ५० हजारांची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या बाबत निकिता जितेंद्र शिरसाठ, खासगी मदतनिस संकेत रणजीत ससाणे या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

Web Title: Talathi in the net of bribery while accepting a bribe of 50,000

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here