‘संगमनेर तालुक्याची मोडतोड राजकीय हेतू, बाळासाहेब थारोत यांनी तोफ डागली
Breaking News | Sangamner संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक, अकोले तालुक्यातील राजुर आणि नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथं अपर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव.
संगमनेर: जिल्ह्याच्या विभाजनाऐवजी नवीन तीन अपर तहसील कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक, अकोले तालुक्यातील राजुर आणि नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथं अपर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थारोत यांनी आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालयाची निर्मिती प्रस्ताव म्हणजे, हे विभाजन प्रशासकीय सोयीसाठी नसून राजकीय हेतूने प्रेरित असल्याची तोफ डागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर राज्यात 21 जिल्ह्यांची नव्याने निर्मिती होणार, अशी पोस्ट व्हायरल झाली होती. यात अहिल्यानगर जिल्ह्याचा देखील समावेश होता. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा विभाजनाच्या चर्चांना उधाण आले होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, असे काही होणार नाही, असे सांगून या चर्चाना पूर्णविराम दिली. परंतु सोयीनुसार अपर जिल्हाधिकारी कार्यालये सुरू करण्यात येतील, असे सांगितले होते. आता अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाऐवजी नवीन तीन अपर तहसील कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. तीनही तालुक्यांच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव सादर केले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात, संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक, अकोले तालुक्यातील राजूर आणि नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथं अपर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला नुकतेच सादर केले आहेत. हे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य सरकारला सादर होतील. तत्कालीन महसूलमंत्री यांनी नवीन अपर तहसील कार्यालये सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. महसूलमंत्री बावनकुळे यांनी या प्रस्तावांना गती दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक इथं स्वतंत्र अपर तहसील कार्यालयाची निर्मिती प्रस्तावावर माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तोफ डागली आहे. प्रस्तावित कार्यालयात ज्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. ते पाहता हे विभाजन प्रशासकीय सोयीसाठी नसून राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा आक्षेप माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री थोरात यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीस पत्रकात, “अहिल्यानगर जिल्हाधिकारी महसूल शाखा यांनी राजकीय दबावातून अध्यादेश काढला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक इथं स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत घाट घातला आहे. संगमनेर तालुका हा विस्तारानं मोठा असूनही संगमनेर शहर मध्यवर्ती असल्याने सर्वांच्या सोयीचे आहे. याचबरोबर शहरात मध्यवर्ती, असे भव्य तहसील व प्रांताधिकारी कार्यालय आहे”. मात्र, नव्याने प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा डाव आखला जात आहे, तो कदापिही सहन केला जाणार नाही, असा इशारा थोरात यांनी दिला.
‘संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा उद्देश यात दिसतो. संगमनेर शहराच्या अगदी जवळ असलेली गावेदेखील संगमनेर तहसील कार्यालयापासून वेगळी करण्यात येणार आहेत, यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे. प्रशासन जर राजकीय दबावाखाली येऊन हा अन्यायकारक निर्णय घेणार असेल, तर संगमनेर तालुका हा अन्याय सहन करणार नाही. या अन्यायकारक निर्णयाविरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाईल’, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
Web Title: Demolition of Sangamner taluka is a political motive, Balasaheb Thorat fired
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News