अहिल्यानगर: तरुणावर पोक्सोचा गुन्हा दाखल, महाविद्यालयीन विद्यार्थिनीची तक्रार
Breaking News | Ahilyanagar: एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करत तिची छेडछाड करणाऱ्या तरुणाविरुद्ध नगर तालुका पोलिसांनी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल.
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करत तिची छेडछाड करणाऱ्या तरुणाविरुद्ध नगर तालुका पोलिसांनी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला.
मनीष सुनील लबडे (रा. पाथर्डी) असे या आरोपीचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी नगर तालुक्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती मुलींच्या होस्टेलमध्ये राहते. आरोपी मनीष लबडे तिला त्रास देत होता. तिचा वारंवार पाठलाग करायचा. त्याने तिच्याच महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता. त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत मुलीने वडिलांना माहिती दिली. तिच्या
वडिलांसह इतर नातेवाईकांनी मनीष लबडे व त्याच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यास समजून सांगितले होते. तरीही त्याचे त्रास देणे सुरूच होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये इतर मुलांशी बोलते म्हणून त्याने तिला मारहाणही केली होती. त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी त्याला समज दिली होती. असे असताना २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता लबडे महाविद्यालय परिसरात तोंड बांधून आला. त्याने त्या मुलीचा पाठलाग करीत पुन्हा छेड काढली. हा प्रकार मुलीने तिच्या वडिलांना सांगितला. त्यावर वडिलांसह नातेवाईकांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात जात सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना हा प्रकार सांगितला. त्यावर गिते यांनी मुलीची फिर्याद नोंदवून घेत आरोपी मनीष लबडे याच्या विरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल केला.
Web Title: POCSO case registered against youth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News