अजितदादा आणि शरद पवार यांच्यात गुफ्तगू, राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ
Ajit Pawar and Sharad Pawar: अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण.
मुंबई: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा गेली अनेक दिवस माध्यमांमध्ये सुरू आहे. यातच आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. याच कार्यक्र माच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले. मात्र काही दिवसांपासून काका- पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभेसाठी अजित पवार आणि शरद पवार आज एकत्र आले. यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी पीएला विचारले कुठे बसायचे आहे, यावर पीएने ‘साहेब इकडे आत बसलेत असे म्हणताच अजित पवार अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले. यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, देशात गत काही दिवसांपासून मोठ्या राजकीय उलथापालथी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसून येतील. या दोन्ही पक्षांकडे भाजपला आवश्यक असणाऱ्या जागा उपलब्ध आहेत. संजय राऊत यांच्या विधानातूनही हे अधोरेखित होते. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्यामुळे कुणीही पक्ष सोडून जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
Web Title: Guftgu between Ajit Pawar and Sharad Pawar, excitement again in the political field
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News